
नांदेड, 10 ऑगस्ट (हिं.स.) । 'सामाजिक बांधिलकी' जपत बिलोली येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप आणि भव्य नागरिक सत्कार सोहळा आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. सामाजिक बांधिलकी म्हणून विद्यार्थ्यांना् शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक जास्त ज्ञान आत्मसात करावे, मोबाईल पेक्षा शिक्षणाकडे अधिक लक्ष द्यावे आणि यशाची उंची गाठावी असे आवाहन आमदार चिखलीकर यांनी यावेळी केले कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष रंजीत हिवराळे आणि श्रीनिवास पाटील गुजरीकर यांंनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis