
अमरावती, 11 ऑगस्ट (हिं.स.) :
प्रलंबित मागण्या संदर्भात अनुदानित वसतिगृहातील कर्मचारी मागील तीन चार वर्षापासून मंत्रालयाच्या पायर्!या झिजवत आहेत. तरीसुद्धा त्यांच्या समस्यांचे निराकरण झालेच नाही. या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमुुुळे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. शेवटी संतप्त कर्मचाऱ्यांनी आज पासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषणाला सुरवात केली आहे. राज्यात दोन हजार ३८८ अनुदानित वसतिगृह आहे. या वसतिगृहाचे अधीक्षक दहा हजार, स्वयंपाकी आठ हजार ५००, मदतनीस व चौकीदारांना सात हजार ५००, असे दरमहा ५० टक्के वेतन शासनाकडून देण्यात येते. मात्र, बहुतांश संस्था वेतन हिस्सा ५० टक्के देत नाही. नियमानुसार कर्मचार्!यांचे तब्बल एक हजार २५० कोटी रुपये वेतनाचे थकीत आहे. वसतिगृहातील कर्मचारी अर्ध्या मोबदल्यात २४ तास सेवा देत आहेत. आयुक्तालयाने अनेकदा शासन नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देश जिल्हा समाजकल्याण विभागाला दिले आहे. मात्र, स्थानिक पातळीवर केवळ पाठ फिरवण्यात आली. त्याचप्रमाणे कर्मचार्!यांना समान काम समान वेतनानुसार वेतन श्रेणी लागू करावी, आंदोलन राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रामहरी गुघाने, कार्याध्यक्ष प्रदीप वाकपैजन, शैलेश केशरवाणी, बेबी आखरे, सुनील आडे, किशोर देशट्टीवार, गणपत जाधव, अमोल गिरी, सुदाम घुले, विश्वनाथ चव्हाण, श्रावण चव्हाण, श्रीराम गावंडे, नसीम सरवर शेख, अनिता वाकडे, मंगला झोडे, लक्ष्मी पडगनकर, उषा गोरे, सुनंदा कावडे, रमेश गेडाम, हिरालाल राठोड, सनी आडे आदी वसतिगृह कर्मचार्!यांची उपस्थिती होती.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी