अकोला पंचायत समितीच्या कृषी विभागात ‘सन्नाटा’; दुपारी १२ वाजले, तरी अधिकारी-कर्मचारी गायब?
अकोला, 11 ऑगस्ट, (हिं.स.)। पंचायत समिती अकोला येथील कृषी विभागाच्या कार्यालयीन कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुपारी १२ वाजण्याची वेळ उलटून गेल्यानंतरही कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याचे चित्र दिसून आल्याने नागरिकांमध्ये
Photo


अकोला, 11 ऑगस्ट, (हिं.स.)। पंचायत समिती अकोला येथील कृषी विभागाच्या कार्यालयीन कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुपारी १२ वाजण्याची वेळ उलटून गेल्यानंतरही कार्यालयात अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याचे चित्र दिसून आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

शेतकरी व नागरिकांच्या विविध कामांसाठी पंचायत समितीच्या कृषी विभागात ये-जा सुरू असते. मात्र, कार्यालयीन वेळेतच संबंधित विभागात कोणीही उपस्थित नसल्यास नागरिकांनी आपली कामे कोणाकडे करायची, असा सवाल उपस्थित होत आहे.

कार्यालयीन वेळेत कर्मचारी-अधिकारी नेमके कुठे होते? त्यांची उपस्थिती नोंदवहीत नोंद झाली आहे का? कार्यालयीन कामकाजाच्या वेळेचे पालन केले जात आहे का? याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, संबंधित विभागात अचानक पाहणी करून बायोमेट्रिक/उपस्थिती नोंद तपासावी आणि कर्तव्यावर गैरहजर आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या कामासाठी असलेले कार्यालयच दुपारी ‘ओस’ पडत असेल, तर प्रशासनाचा कारभार नेमका चालतोय तरी कसा? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande