
अकोला, 11 ऑगस्ट (हिं.स.)। अकोला जिल्ह्यातील खांबोरा व ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची मुख्य जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. दहीगाव गावंडे गावाजवळ सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या कामा दरम्यान खोदकाम करत असताना ही जलवाहिनी फुटली. यामुळे रस्त्यावर पाण्याचे मोठमोठे कारंजे उडाले असून पाण्याचा मोठा प्रवाह वाहून गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खांबोरा आणि ६४ खेडी पाणीपुरवठा योजनेची ही जुनी जलवाहिनी अत्यंत शिकस्त झाली आहे. या वाहिनीवर ठिकठिकाणी गळती लागणे आणि खोदकामादरम्यान ती फ टणे अशा घटना वारंवार घडत आहेत. या योजनेच्या पुनरुज्जीवनासाठी आणि नूतनीकरणासाठी जिल्हा परिषद पातळीवर
काळात अनेक प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत; मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे अद्यापही ही जुनी जलवाहिनी बदलण्यात आलेली नाही. पाणीटंचाईच्या काळात चिंतेत भरः यंदा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिलेले आहे. अकोला शहरासह ६४ खेड्यांची तहान भागवणाऱ्या काटेपूर्णा (महान) प्रकल्पात सध्या अवघा २५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. अशा गंभीर परिस्थितीमध्ये ऐन पाणीटंचाईच्या निष्काळजीपणामुळे मुख्य जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याने परिसरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. प्रशासनाने तातडीने या गळतीची दुरुस्ती करून ६४ खेड्यांचा पाणीपुरवठा सुळीत करावा आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे