
अकोला, 11 ऑगस्ट (हिं.स.)। अकोल्यातील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे प्रकल्पग्रस्तांनी आज आपल्या विविध मागण्यांसाठी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून कृषी विद्यापीठातील प्रकल्पग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत.. कृषी विद्यापीठासाठी शेतकर्यांच्या जमिनी गेल्याने त्यांच्या माथी प्रकल्पग्रस्ताचा शिक्का लागला. त्यांच्या संसाराला लागलेले ग्रहण दूर झाले नाही. शासन व प्रशासनाच्या कात्रीत सापडल्यामुळे जीवनाची होरपळ सुरूच आहे.. दरम्यान आज पुन्हा प्रकल्पग्रस्तांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात (पंदेकृवि) ११५ बनावट देयकांच्या माध्यमातून सुमारे ३८ लाख ७३ हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार समोर आला असून, १३८ फाईल्स गहाळ झाल्या आहेत. या घोटाळ्यासंदर्भात एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, विद्यापीठ प्रशासनाचे कुलगुरू व कुलसचिव यावर मौन बाळगून असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये संताप उसळला आहे...
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे