राखीपौर्णिमेनिमित्त अकोला रेल्वे टपाल काऊंटरवर विशेष सुविधा
अकोला, 11 ऑगस्ट (हिं.स.)। राखीपौर्णिमेनिमित्त राखी भेटवस्तू, पार्सल आणि इतर टपाल वस्तूंच्या बुकिंगमध्ये होणारी संभाव्य वाढ लक्षात घेता सर्वसामान्यांच्या सोयीसाठी अकोला रेल्वेस्थानक येथील टपाल काऊंटरवर रात्री उशिरापर्यंत बुकिंगची सुविधा उपलब्ध करून
राखीपौर्णिमेनिमित्त अकोला रेल्वे टपाल काऊंटरवर विशेष सुविधा


अकोला, 11 ऑगस्ट (हिं.स.)। राखीपौर्णिमेनिमित्त राखी भेटवस्तू, पार्सल आणि इतर टपाल वस्तूंच्या बुकिंगमध्ये होणारी संभाव्य वाढ लक्षात घेता सर्वसामान्यांच्या सोयीसाठी अकोला रेल्वेस्थानक येथील टपाल काऊंटरवर रात्री उशिरापर्यंत बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

राख्यांची पार्सले वेळेवर रवाना आणि वितरित करता यावीत यासाठी अकोला रेल्वे टपाल सेवा काऊंटर दुपारी 4 ते रात्री 9 या वेळेत सुरू राहील. त्यामुळे ग्राहकांना कार्यालयीन वेळेनंतरही आपली पार्सल बुक करता येतील.

या लेट नाईट बुकिंग काऊंटरवर स्पीड पोस्ट, पार्सल सेवा, आंतरराष्ट्रीय टपाल सेवा, आंतरराष्ट्रीय पार्सल सेवा, बल्क बुकिंग व ई-कॉमर्स या सेवा उपलब्ध असतील. आंतरराष्ट्रीय स्पीड पोस्ट, आंतरराष्ट्रीय ट्रॅक्ड पॅकेट सेवा आणि पार्सले यासारख्या विविध आंतरराष्ट्रीय टपाल सेवांचा लाभ ग्राहक घेऊ शकतात. सुरक्षित हाताळणी, पारदर्शक ट्रॅकिंग आणि व्यापक जागतिक पोहोच हे या सुविधांचे वैशिष्ट्य आहे.या विशेष सुविधेचा लाभ अकोलेकर बहिण-भावांनी घ्यावा आणि भारतभर, तसेच परदेशातील आपल्या प्रियजनांपर्यंत राखी, भेटवस्तू, मिठाई आणि सणासुदीच्या इतर वस्तू वेळेवर पोहोचवण्यासाठी त्या आगाऊ बुक कराव्यात. वितरण प्रक्रिया सुरळीत आणि वेळेवर होण्यासाठी, ग्राहकांनी वस्तूंचे योग्य पॅकिंग करावे, पूर्ण टपाल पत्ता व अचूक पिन कोड नमूद करावा आणि प्राप्तकर्त्याचा मोबाईल क्रमांक द्यावा, असे आवाहन नागपूर रेल्वे टपालसेवेचे अधिक्षक गणेश वा. आंभोरे यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande