अकोला - नगरसेवक सागर भारूकाच्या उपोषणाच्या पहिल्याच दिवशी मनपाची कारवाई
अकोला, 11 ऑगस्ट, (हिं.स.)। अकोला महानगरपालिकेतील विविध नागरी प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी उपोषणास बसलेले नगरसेवक सागर भारुका यांच्यावर पहिल्याच दिवशी महानगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाने
Photo


अकोला, 11 ऑगस्ट, (हिं.स.)। अकोला महानगरपालिकेतील विविध नागरी प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी उपोषणास बसलेले नगरसेवक सागर भारुका यांच्यावर पहिल्याच दिवशी महानगरपालिका प्रशासन आणि पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी प्रशासनाने दादागिरी करत उपोषणाचा मंडप गुंडाळला तसेच आंदोलनाचे सर्व साहित्य जप्त केले.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर भारुका यांनी उपोषणाला सुरुवात केली होती. परंतु, मनपा कर्मचाऱ्यांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून बळजबरी करत आंदोलकांना तेथून हटवले असा आरोप करण्यात आला आहे.या कारवाईदरम्यान उपोषणस्थळी ठेवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर राष्ट्रीय महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना व अनादर झाल्याचा आरोपही सागर भारुका आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला आहे.

प्रशासकीय दडपशाहीविरोधात तीव्र संताप -

भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधीवर व कार्यकर्त्यांवर अशा प्रकारे कारवाई केल्यामुळे अकोला मनपाच्या कारभारावर तीव्र ताशेरे ओढले जात आहेत. प्रशासन स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी लोकशाही मार्गाने चाललेला आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप भारूका यांनी केला आहे.

महापुरुषांच्या प्रतिमांचा अनादर करणाऱ्या आणि आंदोलकांवर बेकायदेशीरपणे दबाव आणणाऱ्या मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. या घटनेमुळे अकोल्यातील राजकीय वातावरण अत्यंत तापले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande