जळगाव - अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या जप्त वाहनांचा  २० ऑगस्ट रोजी जाहीर लिलाव
जळगाव, 11 ऑगस्ट,(हिं.स.) जळगाव तालुक्यात अवैध गौणखनिज वाहतूक करताना जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या मालकांविरुद्ध दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारित करण्यात आले आहेत. मात्र, संबंधित वाहनमालकांनी दंडाची रक्कम शासनजमा न केल्याने दंडाची वसुली करण्यासाठी
जळगाव - अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या जप्त वाहनांचा  २० ऑगस्ट रोजी जाहीर लिलाव


जळगाव, 11 ऑगस्ट,(हिं.स.) जळगाव तालुक्यात अवैध गौणखनिज वाहतूक करताना जप्त करण्यात आलेल्या वाहनांच्या मालकांविरुद्ध दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारित करण्यात आले आहेत. मात्र, संबंधित वाहनमालकांनी दंडाची रक्कम शासनजमा न केल्याने दंडाची वसुली करण्यासाठी जप्त वाहनांचा जाहीर लिलाव करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

त्यानुसार जप्त वाहनांचा जाहीर लिलाव दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, जळगाव येथे अटी व शर्तीवर बंद लिफाफ्यातील निविदा व सर्वोच्च बोलीद्वारे करण्यात येणार आहे. लिलावात सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत तहसील कार्यालय, जळगाव येथे स्वीकारले जातील. प्रत्येक वाहनासाठी अर्ज शुल्क रु. ५०० असून, प्रति वाहन रु. ५,००० अनामत रक्कम जमा करणे आवश्यक आहे.

सर्वोच्च बोलीदाराने बोलीची संपूर्ण रक्कम तीन दिवसांच्या आत शासनजमा करणे आवश्यक असून, विहित मुदतीत रक्कम जमा न केल्यास रु. ५,००० अनामत रक्कम जप्त करण्यात येईल. वाहनांची हातची किंमत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी निश्चित केलेली किंमत व प्रलंबित दंडाची रक्कम यापैकी जी रक्कम अधिक असेल ती राहील. लिलावात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी अर्ज, अनामत रक्कम, लिलावाची हातची किंमत व अटी-शर्ती याबाबत तहसीलदार, जळगाव यांच्या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन तहसिलदार शितल राजपूत यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande