बीड जिल्हाधिकाऱ्यांनी पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी
बीड, 11 ऑगस्ट (हिं.स.)। बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नियोजित पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली.बीड येथे नियोजित पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी महोदयांनी कार
Q


बीड, 11 ऑगस्ट (हिं.स.)। बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नियोजित पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली.बीड येथे नियोजित पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी महोदयांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. यावेळी कार्यक्रमाचे स्थळ, बैठक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था तसेच इतर आवश्यक बाबींची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

याप्रसंगी मा. अतिरिक्त जिल्हाधिकारी आश्विनी जिरंगे, उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच पशुवैद्यकीय विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते.उद्घाटन कार्यक्रमाचे नियोजन, समन्वय आणि आवश्यक व्यवस्था वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून तयारीला वेग देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande