मुख्यमंत्र्यांच्या छ. संभाजी नगरमधील कार्यक्रमाच्या निमित्ताने आढावा बैठका संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 11 ऑगस्ट (हिं.स.)राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि राष्ट्रभक्तीची भावना नागरिकांमध्ये अधिक दृढ करण्यासाठी १४ ऑगस्ट रोजी ‘तिरंगा यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या यात्रेच्या पार्श्वभ
अ


छत्रपती संभाजीनगर, 11 ऑगस्ट (हिं.स.)राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि राष्ट्रभक्तीची भावना नागरिकांमध्ये अधिक दृढ करण्यासाठी १४ ऑगस्ट रोजी ‘तिरंगा यात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या यात्रेच्या पार्श्वभूमीवर विभागीय क्रीडा संकुल येथे खेळाडूंची बैठक संपन्न झाली. यावेळी यात्रेच्या नियोजनाबाबत चर्चा करून प्रत्येक क्षेत्रातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंत्री अतुल चावे यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत १४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ‘तिरंगा यात्रे’च्या पार्श्वभूमीवर हडको मंडळाची नियोजन बैठक संपन्न झाली. यात्रेच्या तयारीबाबत आवश्यक चर्चा करून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विविध जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. सर्वांनी उत्साहाने सहभागी होऊन ही यात्रा यशस्वी करण्याचे आवाहन केले..

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande