
बीड, 11 ऑगस्ट (हिं.स.)। बीड जिल्ह्यातील जिरेवाडी, परळी येथील नियोजित कृषी महाविद्यालयाच्या जागेची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली.
परळी तालुक्यातील जिरेवाडी येथे नियोजित कृषी महाविद्यालयाच्या प्रस्तावित जागेची जिल्हाधिकारी यांनी पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती घेतली.
कृषी शिक्षणाला चालना देतानाच विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, संशोधन व कौशल्याधारित शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कृषी महाविद्यालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. यामुळे परिसरातील शैक्षणिक व कृषी विकासाला नवी दिशा मिळण्यास मदत होणार आहे.
यावेळी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis