
बीड, 11 ऑगस्ट (हिं.स.)। केज शहरातील बस डेपो, छोटे व्यापारी व टपरीधारकांसाठी जागा, शहरातील दोन महामार्गाच्या जोडणीवर प्रचंड वाढलेली वाहतूक व त्यामुळे होणारे अपघात, शहरातील क्रांतीनगर व सोनीजवळा रोड या दोन्ही स्मशाभूमीची वाईट अवस्था, आणि केज पंचायत समितीच्या अधिकारी -कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या इमारती तीन वर्षांपासून हस्तान्तरीत न झाल्याने त्यांची वाईट अवस्था व त्यांचा अवैध गोष्टीसाठी होत असलेला वापर या महत्वाच्या समस्या गेली अनेक वर्षा पासून प्रलंबित आहेत. यासाठी केज विकास संघर्ष समितीने अनेक आंदोलने केली आहेत मात्र प्रशासनाचे या समस्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याने समितीने पुन्हा एकदा मंगळवार दि. ११ ऑगस्ट केज तहसील कार्यालया समोर प्रा. हनुमंत भोसले, नासेर मुंडे, शेषराव घोरपडे यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis