उद्योग संचालनालयाचे नामकरण उद्योग आयुक्तालय; नांदेडचे उपविभागीय कार्यालय बंद
नांदेड, 11 ऑगस्ट, (हिं.स.)। उद्योग संचालनालयाचे नामकरण आता उद्योग आयुक्तालय असे करण्यात आले आहे. तसेच नांदेड येथील उपविभागीय कार्यालय बंद करण्यात आले असून, या कार्यालयाचे सर्व कामकाज सह आयुक्त (उद्योग व सेवा), छत्रपती संभाजीनगर विभाग, विकास भवन, दु
उद्योग संचालनालयाचे नामकरण उद्योग आयुक्तालय; नांदेडचे उपविभागीय कार्यालय बंद


नांदेड, 11 ऑगस्ट, (हिं.स.)। उद्योग संचालनालयाचे नामकरण आता उद्योग आयुक्तालय असे करण्यात आले आहे. तसेच नांदेड येथील उपविभागीय कार्यालय बंद करण्यात आले असून, या कार्यालयाचे सर्व कामकाज सह आयुक्त (उद्योग व सेवा), छत्रपती संभाजीनगर विभाग, विकास भवन, दुसरा मजला, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहे.

यापुढे नांदेड येथील उपविभागीय कार्यालयाशी संबंधित पत्रव्यवहार व कामकाजासाठी संबंधितांनी छत्रपती संभाजीनगर येथील सह आयुक्त (उद्योग व सेवा) यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

दूरध्वनी : (0240) 2331105

ई-मेल : diroaurangabad@maharashtra.gov.in

यापुढे अधिक्षकीय उद्योग अधिकारी, उपविभागीय कार्यालय, नांदेड या कार्यालयास करावयाच्या पत्रव्यवहाराबाबत झालेल्या या बदलाची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा) अमोल इंगळे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande