परभणीत १६ ऑगस्टला जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन
परभणी, 11 ऑगस्ट, (हिं.स.)। जिल्ह्यात उद्योग व व्यवसाय क्षेत्रात गुंतवणूक वाढवून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-२०२६चे आयोजन रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अक्षदा मंगल
परभणीत १६ ऑगस्टला जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन


परभणी, 11 ऑगस्ट, (हिं.स.)। जिल्ह्यात उद्योग व व्यवसाय क्षेत्रात गुंतवणूक वाढवून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-२०२६चे आयोजन रविवार, दि. १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत अक्षदा मंगल कार्यालय, परभणी येथे करण्यात आले आहे.पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद होणार आहे.

परिषदेत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, निर्यातदार, नवउद्योजक, औद्योगिक संघटना, औद्योगिक समूह, शेतकरी उत्पादक संस्था, केंद्र व राज्य शासनाचे अधिकारी तसेच बँकांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.जिल्ह्यातील गुंतवणुकीच्या संधी, उद्योगवाढ, निर्यातवृद्धी आणि उपलब्ध शासकीय योजनांबाबत या परिषदेत मार्गदर्शन व चर्चा होणार आहे.परभणी जिल्ह्यात उद्योग-व्यवसायासाठी पोषक वातावरण निर्माण करून गुंतवणुकीला चालना देण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे.उद्योजक व संबंधित घटकांनी परिषदेस आवर्जून उपस्थित राहून उपलब्ध संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे सहाय्यक आयुक्त (उद्योग व सेवा) यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande