मुंबईत ‘वेल्थ अँड विस्डम’ मंचाच्या माध्यमातून फेडरल बँकेचा एचएनआय ग्राहकांशी संवाद दृढ
मुंबई, 11 ऑगस्ट (हिं.स.)। फेडरल बँकेच्या संपत्ती व्यवस्थापन (वेल्थ मॅनेजमेंट) टीमने मुंबईतील ''द लीला हॉटेल'' येथे आपल्या ''वेल्थ अँड विस्डम'' या मुख्य मालिकेतर्गत एका विशेष कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन केले या विशेष कार्यक्रमात शेअर बाजार
मुंबईत ‘वेल्थ अँड विस्डम’ मंचाच्या माध्यमातून फेडरल बँकेचा एचएनआय ग्राहकांशी संवाद दृढ





मुंबई, 11 ऑगस्ट (हिं.स.)। फेडरल बँकेच्या संपत्ती व्यवस्थापन (वेल्थ मॅनेजमेंट) टीमने मुंबईतील 'द लीला हॉटेल' येथे आपल्या 'वेल्थ अँड विस्डम' या मुख्य मालिकेतर्गत एका विशेष कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन केले या विशेष कार्यक्रमात शेअर बाजारातील घडामोडी, गुंतवणुकीच्या संधी आणि संपत्ती निर्मितीच्या दीर्घकालीन धोरणांवर सखोल चर्चा करण्यासाठी उच्च संपत्ती गटातील बँकेचे ग्राहक (एचएनआय) सहभागी झाले होते.
फेडरल बँकेतर्फे सुरू असलेल्या ग्राहक सहभाग उपक्रमांचा हा कार्यक्रम एक भाग आहे. उच्च उत्पन्न असलेल्या आणि श्रीमंत ग्राहकांना शेअर बाजाराच्या बदलत्या परिस्थितीबाबत तज्ज्ञांचे दृष्टिकोन उपलब्ध करून देणे आणि त्याचबरोबर माहितीपूर्ण गुंतवणुकीचे निर्णय घेण्यास मदत करण्याच्या दृष्टीकोनातून हा कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे. संध्याकाळच्या सत्रात फेडरल बँकेच्या वेल्थ मॅनेजमेंट आणि बंकाश्युरन्स विभागाचे कंट्री हेड विरेंद्र सोमवंशी; मुंबई झोनचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि विभागीय प्रमुथ ऋषी झा तसेच बडोदा बीएनपी परिबा अॅसेट मॅनेजमेंट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे वरिष्ठ फंड व्यवस्थापक जितेन्द्र श्रीराम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या तज्ज्ञ व्यक्तींनी सध्याची आर्थिक परिस्थिती, शेअर बाजाराचे भवितव्य आणि गुंतवणूकदारांसाठी संपत्ती व्यवस्थापनाच्या नव्याने तयार होत असलेल्या संधी याबाबत आपला दृष्टीकोन मांडला.
सदर कार्यक्रम संवादात्मक स्वरूपात होता. बँक ग्राहक आणि गुंतवणूक क्षेत्रातील तज्ज्ञांमध्ये अतिशय साधकबाधक चर्चा झाली. त्यामुळे सहभागी ग्राहकांना आजच्या झपाट्याने बदलत असलेल्या गुंतवणुकीच्या वातावरणात यशस्वीरीत्या वाटचाल करण्यासाठी योग्य दिशा मिळण्यास मदत झाली. 'वेल्य अँड विस्डम' ही विशेष मालिका ज्ञानावर आधारित संवाद साधणे आणि निवडक अनुभवांद्वारे ग्राहक संबंध दृढ करण्याबाबत फेडरल बँकेची कटिबद्धता अधोरेखित करते. यातुन ग्राहकांना परिपूर्ण असे आर्थिक निर्णय घेण्यास आणि त्यांच्या संपत्ती निर्मितीची दीर्घकालीन उद्दिष्टे साध्य करण्यास पाठबळ मिळते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule

 rajesh pande