यवतमाळ : आर्णीत रस्त्याच्या तात्पुरत्या डागडुजीवर नागरिकांचा रोष
यवतमाळ , 11 ऑगस्ट (हिं.स.)। शहरातील प्रभाग क्रमांक चारमधील मुख्य रस्त्यावर खड्डे बुजविण्यासाठी मोठे गोटे असलेला मुरूम टाकण्यात येत आहे. या मुरमातील मोठ्या गोट्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र न
खड्डे बुजविण्यासाठी गोटाड मुरूम सभापतींच्या प्रभागातच मलमपट्टी; प्रशासनावर नागरिकांचा रोष


यवतमाळ , 11 ऑगस्ट (हिं.स.)।

शहरातील प्रभाग क्रमांक चारमधील मुख्य रस्त्यावर खड्डे बुजविण्यासाठी मोठे गोटे असलेला मुरूम टाकण्यात येत आहे. या मुरमातील मोठ्या गोट्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक चार हा नगर परिषदेच्या बांधकाम सभापती अंजली खंदार यांचा प्रभाग आहे. बांधकाम विभागाची जबाबदारी असलेल्या सभापतींच्या प्रभागातील मुख्य रस्त्यावरच अशा प्रकारे निकृष्ट दर्जाचा व गोटाड असलेला मुरूम टाकून खड्ड्यांवर मलमपट्टी केली जात असल्याने बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पावसाळ्यात रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारक आधीच त्रस्त असताना त्यावर योग्य पद्धतीने बारीक मुरुम किंवा चुरी टाकण्याची गरज होती. मात्र, त्याऐवजी मोठे गोटे असलेला मुरूम टाकण्यात आला आहे. त्यामुळे दुचाकी अनियंत्रित होऊन अपघात होण्याची शक्यता आहे. पादचार्!यांनाही या रस्त्यावरून चालताना मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डे बुजविण्याच्या नावाखाली केवळ मलमपट्टी न करता कायमस्वरूपी दर्जेदार रस्त्याचे काम करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बांधकाम सभापतींच्या स्वत:च्या प्रभागातील रस्त्याची ही अवस्था असेल, तर शहरातील इतर भागांतील रस्त्यांची स्थिती काय असेल, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन रस्त्याची पाहणी करावी आणि निकृष्ट मुरुमाऐवजी दर्जेदार मुरुमाचा वापर करून रस्ता सुस्थितीत करावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

याबाबत संबंधित ठेकेदाराला मुरमातील मोठे दगड उचलण्यात सांगितले आहे. पुन्हा असा मुरुम शहरातील कुठल्याच रस्त्यावर टाकायचा नाही, अशी समज दिली आहे. मुख्याधिकारी व बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी, कर्मचार्!यांना लेखी पत्र देवून त्यांच्यावर बारीक मुरूम टाकण्याची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. तरीही असा प्रकार पुन्हा झाल्यास ट्रिपचे देयक नामंजूर करावे किंवा तो मुरुम घेऊन जाण्यास सांगावे, असे सांगण्यात येणार आहे. - अंजली खंदार, बांधकाम सभापती, नगर परिषद आर्णी

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande