सोलापूर - केगाव पुलाजवळ लोखंडी बॅरिकेडिंग; अपघाताचा धोका टळला
सोलापूर, 11 ऑगस्ट (हिं.स.)पुणे-सोलापूर महामार्गावरील केगाव पुलाजवळ सर्व्हिस रोडवरून थेट मुख्य रस्त्यावर येण्यासाठी तयार झालेल्या मोठ्या मोकळ्या जागेमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. या धोकादायक ठिकाणी आता मजबूत लोखंडी बॅरिकेडिंग उभारण्यात आल्या
सोलापूर - केगाव पुलाजवळ लोखंडी बॅरिकेडिंग; अपघाताचा धोका टळला


सोलापूर, 11 ऑगस्ट (हिं.स.)पुणे-सोलापूर महामार्गावरील केगाव पुलाजवळ सर्व्हिस रोडवरून थेट मुख्य रस्त्यावर येण्यासाठी तयार झालेल्या मोठ्या मोकळ्या जागेमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. या धोकादायक ठिकाणी आता मजबूत लोखंडी बॅरिकेडिंग उभारण्यात आल्याने संभाव्य अपघात टळला आहे.

पुणे-सोलापूर मार्गिकेवर केगाव पुलाच्या सुरुवातीला तसेच पुलाच्या शेवटच्या टप्प्यात सर्व्हिस रोड आणि मुख्य महामार्गादरम्यान मोठे गॅप तयार झाले होते. त्यामुळे सर्व्हिस रोडवरून वाहने अचानक मुख्य रस्त्यावर येत होती. यामुळे महामार्गावरील वेगवान वाहतुकीला धोका निर्माण होऊन अपघाताची शक्यता वाढली होती.

या समस्येची दखल घेत सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक नियंत्रण शाखेने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे (NHAI) तातडीने पाठपुरावा केला. वाहतूक शाखेच्या सूचनेनंतर NHAI प्रशासनाने संबंधित ठिकाणी लोखंडी बॅरिकेडिंग उभारून वाहनांना थेट महामार्गावर प्रवेश करण्यास प्रतिबंध केला.

यामुळे सर्व्हिस रोडवरून अचानक मुख्य महामार्गावर येणाऱ्या वाहनांना आळा बसला असून, वाहनधारकांसाठी हा मार्ग अधिक सुरक्षित झाला आहे. “वाहतूक शाखेच्या पाठपुराव्याची NHAIने तत्काळ दखल घेत उपाययोजना केल्याने अपघाताचा मोठा धोका टळला आहे,” अशी माहिती वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिस निरीक्षक विजय खोमणे यांनी दिली.

या कामासाठी NHAIचे अधिकारी महेश येमूल यांनी सकारात्मक आणि गतिमान प्रतिसाद दिला. वाहतूक शाखेच्या सूचनेनुसार तातडीने उपाययोजना केल्याबद्दल पोलिस निरीक्षक विजय खोमणे यांनी NHAI प्रशासन आणि अधिकारी महेश येमूल यांचे आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande