ललिता ज्वेलरी मार्टचा आयपीओ १७ ऑगस्टला होणार खुला
मुंबई, 11 ऑगस्ट (हिं.स.)। ललिता ज्वेलरी मार्ट लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक भागविक्री अर्थात आयपीओ येत्या १७ ऑगस्ट २०२६ रोजी खुला होणार असून १९ ऑगस्ट रोजी बंद होणार आहे. कंपनीने प्रति इक्विटी शेअर ५ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरसाठी १९० ते २०१ र
Lalitha Jewellery Mart IPO Open on August 17


Lalitha Jewellery Mart IPO to Open on August 17


मुंबई, 11 ऑगस्ट (हिं.स.)। ललिता ज्वेलरी मार्ट लिमिटेडचा प्रारंभिक सार्वजनिक भागविक्री अर्थात आयपीओ येत्या १७ ऑगस्ट २०२६ रोजी खुला होणार असून १९ ऑगस्ट रोजी बंद होणार आहे. कंपनीने प्रति इक्विटी शेअर ५ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअरसाठी १९० ते २०१ रुपये असा किंमतपट्टा निश्चित केला आहे. गुंतवणूकदारांना किमान ७४ इक्विटी शेअर्ससाठी बोली लावता येणार असून त्यानंतर ७४ शेअर्सच्या पटीत अर्ज करता येईल. या आयपीओद्वारे कंपनी १,२०० कोटी रुपयांपर्यंतचे नवीन शेअर्स जारी करणार आहे. याशिवाय कंपनीचे प्रवर्तक एम. किरण कुमार जैन यांच्याकडून ५०० कोटी रुपयांपर्यंतच्या शेअर्सची विक्री केली जाणार आहे. कंपनीच्या आजच्या तारखेपर्यंत ५ रुपये दर्शनी मूल्याचे ४९,९९,७७,१५६ इक्विटी शेअर्स आऊटस्टँडिंग आहेत.

ललिता ज्वेलरी मार्ट ही ‘ललिता’ या ब्रँड नावाखाली कार्यरत असलेली ज्वेलरी रिटेल कंपनी आहे. दक्षिण भारतातील ग्राहकांच्या प्रादेशिक पसंती लक्षात घेऊन कंपनी सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या दागिन्यांची विविध श्रेणी उपलब्ध करून देते. ३१ मार्च २०२६ रोजी कंपनीची तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि पुद्दुचेरी येथे ५१ शहरांमध्ये एकूण ६१ स्टोअर्स होती. या स्टोअर्सचे एकूण क्षेत्रफळ ६,५०,८८१ चौरस फूट आहे. कंपनीच्या ६१ स्टोअर्सपैकी आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ४५ स्टोअर्स टियर-२ आणि टियर-३ शहरांमध्ये होती. या शहरांमधून कंपनीच्या महसुलात ६०.२५ टक्के वाटा आला. क्रिसिलच्या अहवालानुसार, प्रमुख संघटित ज्वेलर्समध्ये कंपनीचा प्रति स्टोअर ऑपरेटिंग महसूल आर्थिक वर्ष २०२६ मध्ये ४१०.२३ कोटी रुपये राहिला.

कंपनीकडे तमिळनाडूमध्ये दोन उत्पादन युनिट्स आहेत. चेन्नईतील थिरुमुडीवक्कम येथील उत्पादन युनिटचे कामकाज २ डिसेंबर २०२४ पासून सुरू झाले. आर्थिक वर्ष २०२४ मधील १६,७८८.०५ कोटी रुपयांच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल २५,०२३.९३ कोटी रुपयांवर पोहोचला. याच कालावधीत निव्वळ नफा ३५९.८३ कोटी रुपयांवरून वाढून १,००९.८२ कोटी रुपये झाला. या आयपीओचे बुक-रनिंग लीड मॅनेजर्स आनंद राठी ॲडव्हायझर्स आणि एक्विरस कॅपिटल आहेत. ऑफरची रजिस्ट्रार कंपनी एमयूएफजी इनटाईम इंडिया आहे. ऑफरमध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी किमान ५० टक्के, बिगर-संस्थात्मक बोलीदारांसाठी किमान १५ टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठी किमान ३५ टक्के हिस्सा उपलब्ध असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande