‘जरांगेंच्या आंदोलनाला प्रसाद लाड यांची आर्थिक रसद’; लक्ष्मण हाके यांचा आरोप
सोलापूर, 11 ऑगस्ट (हिं.स.)। मराठा समाजातील लोकप्रतिनिधींची रद्द झालेली जात प्रमाणपत्रे पुन्हा मंजूर करून घेण्यासाठी मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आर्थिक रसद पुरविल्याचा थेट आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांन
laximan Hakke


सोलापूर, 11 ऑगस्ट (हिं.स.)। मराठा समाजातील लोकप्रतिनिधींची रद्द झालेली जात प्रमाणपत्रे पुन्हा मंजूर करून घेण्यासाठी मनोज जरांगे आंदोलन करत आहेत. या आंदोलनाला भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आर्थिक रसद पुरविल्याचा थेट आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला.

हाके पंढरपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे आणि प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका केली. “प्रसाद लाड यांना मनोज जरांगे यांना फीडिंग करण्याची सवय लागली आहे. जरांगे यांना सतत लक्ष वेधून घेण्याचा रोग जडला आहे,” असा आरोप हाके यांनी केला. आमदार प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल ग्रुप कंपनीतील रोजगार आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरही हाके यांनी प्रश्न उपस्थित केले. “क्रिस्टल ग्रुपमध्ये एक लाख नोकऱ्या असल्याचा दावा केला जातो. मात्र, तेथे आरक्षण नाही आणि कर्मचाऱ्यांना वेळेवर पगारही दिला जात नाही,” असे ते म्हणाले.

सरकारने लाड यांना महत्त्व का दिले आहे, असा सवालही हाके यांनी उपस्थित केला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्ये करण्यासाठीही प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान, हाके यांच्या या आरोपांवर प्रसाद लाड किंवा मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया मिळालेली नाही.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande