लातूर : नगराध्यक्षांकडून बोथी तलाव, फिल्टर प्लांटची पाहणी
लातूर, 11 ऑगस्ट, (हिं.स.)।चाकूर शहरासाठी पाणीपुरवठा होत असल्याल्या बोथी तलाव स्रोत तसेच फिल्टर प्लांटची पाहणी करून पाणीपुरवठा व्यवस्थेची प्रत्यक्ष माहिती नगराध्यक्ष भागवत फुले यांनी घेतली. यावेळी नागरिकांना स्वच्छ मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी
नगराध्यक्षांनी केली पाहणी


लातूर, 11 ऑगस्ट, (हिं.स.)।चाकूर शहरासाठी पाणीपुरवठा होत असल्याल्या बोथी तलाव स्रोत तसेच फिल्टर प्लांटची पाहणी करून पाणीपुरवठा व्यवस्थेची प्रत्यक्ष माहिती नगराध्यक्ष भागवत फुले यांनी घेतली.

यावेळी नागरिकांना स्वच्छ मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. चाकूर येथील नागरिकांना स्वच्छ पाणी, उत्तम सुविधा आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे नगराध्यक्ष फुले यांनी सांगितले. या प्रसंगी नरसिंग गोलावार, संजय पाटील व पाणीपुरवठा कर्मचारी उपस्थित होते. नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून सकाळपासूनच विविध प्रभागांत जाऊन नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या नगराध्यक्ष भागवत फुले जाणून घेत आहेत. नागरिकांनी निदर्शनास आणून दिलेल्या प्रश्नांना प्राधान्याने सोडविण्याचा आमचा संकल्प आहे. स्वच्छ चाकूर, स-दर चाकूर करण्यासाठी नागरिकांचे सहकार्यही तितकेच महत्त्वाचे आहे. नागरिकांनी कचरा घंटागाडीतच टाकावा, नाल्यांमध्ये प्लास्टिक किंवा इतर कचरा टाकू नये आणि नगरपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष भागवत फुले यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande