
परभणी, 11 ऑगस्ट (हिं.स.)। महानगरपालिकेंतर्गत कर्मचा-यांच्या थकीत वेतनासह वाढीव जीएसटी अनुदान व त्या अनुदानाच्या फरकाची रक्कम त्वरित मिळावी या मागणीकरीता महानगरपालिकेंतर्गत अधिकारी-कर्मचा-यांनी सुरु केलेले बेमुदत धरणे आंदोलन दुस-या दिवशीही सुरुच होते.
दरम्यान, महापालिकेंतर्गत कर्मचार्यांच्या या आंदोलनाने दैनंदिन कामकाज पूर्णतः कोलमडले आहे. या आंदोलनाची पालिका प्रशासनासह सरकार दरबारी दखल न घेतली गेल्यामुळे संतप्त आंदोलनकर्त्यांनी उद्या बुधवारी शनिवारी बाजारातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भिकमागो आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
संघटनेचे अध्यक्ष नासेर शेख, उपाध्यक्ष विनय ठाकूर, सचिव व्ही.एस. उफाडे तसेच अनुसयाबाई जोगदंड, के.के. भारसाखळे, जालिंदर कावळे, मनोज चव्हाण, खाजा नजीर खान, अमरजीत कुलकर्णी, खाजा मोईन खान, सीताबाई तांबे, शोभाबाई मातोर्डे, नंदाबाई सोनवणे आदींनी जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, 14 ऑगस्ट रोजी या आंदोलनकर्त्यांनी मुंडन आंदोलन करण्याचाही निर्णय जाहीर केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis