स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण
पुणे, 11 ऑगस्ट (हिं.स.)। भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन येथे ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे. तत्पूर्वी जिल्हाधिक
स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण


पुणे, 11 ऑगस्ट (हिं.स.)। भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शनिवारी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वाजता राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन येथे ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम होणार आहे.

तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ७.३० वाजता व शनिवार वाडा येथे सकाळी ८ वाजता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे. ध्वजारोहण कार्यक्रमास राष्ट्रीय पोशाखात उपस्थित रहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande