
छत्रपती संभाजीनगर, 11 ऑगस्ट (हिं.स.) छत्रपती संभाजीनगर येथे संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्त श्री महारुद्र हनुमान मंदिर संस्थान, प्रकाश नगर येथे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. पारंपरिक वेशातील नागरिक, टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाचा जयघोष यामुळे संपूर्ण परिसर प्रसन्न आणि मंगलमय भासत होता. असे सांगताना मंत्री सावे म्हणाले की, संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथी निमित्ताने मोठा उत्सव साजरा होत आहे. मिरवणुकीतील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग ऊर्जा वाढविणारा ठरला. छत्रपती संभाजी नगर शहर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis