पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती प्रादेशिक परिवहन कार्यक्षेत्रासाठी नवे दर निश्चित
पुणे, 11 ऑगस्ट (हिं.स.)पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील रुग्णवाहिकांसाठी सुधारित भाडेदर लागू करण्यात आले आहेत. रुग्णवाहिकेत रुग्ण बसल्यापासून परतीच्या प्रवासाच्या अंतरापर्यंत हे दर लागू राहणार आहेत. न
hgf


पुणे, 11 ऑगस्ट (हिं.स.)पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील रुग्णवाहिकांसाठी सुधारित भाडेदर लागू करण्यात आले आहेत. रुग्णवाहिकेत रुग्ण बसल्यापासून परतीच्या प्रवासाच्या अंतरापर्यंत हे दर लागू राहणार आहेत. निश्चित केलेल्या दरपत्रकापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या रुग्णवाहिका चालक व मालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली.

सुधारित दरपत्रकानुसार, वातानुकूलित नसलेल्या मारुती व्हॅनसाठी २५ किलोमीटर किंवा दोन तासांसाठी ७०० रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी १६ रुपये, तर प्रतीक्षा शुल्क १२५ रुपये प्रतितास राहणार आहे. प्रतिदिन अथवा ३०० किलोमीटरसाठी ४ हजार रुपये दर असून, इंधन, देखभाल, दुरुस्ती व चालक वगळून १ हजार रुपये प्रतिदिन दर निश्चित करण्यात आला आहे.

अवातानुकूलित मारुती ईको व टाटा मॅजिकसाठी २५ किलोमीटर किंवा दोन तासांसाठी ९०० रुपये, त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी १७ रुपये आणि प्रतीक्षा शुल्क १२५ रुपये प्रतितास आकारता येईल. प्रतिदिन अथवा ३०० किलोमीटरसाठी ४ हजार ५०० रुपये, तर इंधन, देखभाल, दुरुस्ती व चालक वगळून १ हजार २०० रुपये प्रतिदिन दर राहणार आहे.अवातानुकूलित महिंद्रा बोलेरो व फोर्स क्रुझरसाठी २५ किलोमीटर किंवा दोन तासांसाठी १ हजार २०० रुपये, त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी १८ रुपये आणि प्रतीक्षा शुल्क १५० रुपये प्रतितास निश्चित करण्यात आले आहे. प्रतिदिन अथवा ३०० किलोमीटरसाठी ५ हजार रुपये, तर इंधन, देखभाल, दुरुस्ती व चालक वगळून १ हजार ५०० रुपये प्रतिदिन दर राहील.

अवातानुकूलित फोर्स टेम्पो ट्रॅव्हलरसाठी २५ किलोमीटर किंवा दोन तासांसाठी १ हजार ५०० रुपये, त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी २२ रुपये आणि प्रतीक्षा शुल्क १७५ रुपये प्रतितास निश्चित करण्यात आले आहे. प्रतिदिन अथवा ३०० किलोमीटरसाठी ७ हजार रुपये, तर इंधन, देखभाल, दुरुस्ती व चालक वगळून २ हजार रुपये प्रतिदिन दर राहणार आहे.

वातानुकूलित फोर्स टेम्पो ट्रॅव्हलर (आयसीयू) साठी २५ किलोमीटर किंवा दोन तासांसाठी २ हजार ५०० रुपये, त्यापुढील प्रत्येक किलोमीटरसाठी ३० रुपये आणि प्रतीक्षा शुल्क २५० रुपये प्रतितास निश्चित करण्यात आले आहे. प्रतिदिन अथवा ३०० किलोमीटरसाठी १० हजार रुपये, तर इंधन, देखभाल, दुरुस्ती व चालक वगळून ४ हजार रुपये प्रतिदिन दर राहणार आहे.

दरपत्रकापेक्षा अधिक भाडे आकारल्याचे आढळल्यास संबंधित वाहनमालक किंवा चालकावर दंडात्मक कारवाई केली जाईल. पहिल्या गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये, तर तिसऱ्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी २० हजार रुपये दंड आकारण्यात येईल, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande