
बीड, 11 ऑगस्ट (हिं.स.)।
बीड जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या उपस्थितीत
नायगाव मयूर वन्यजीव अभयारण्याच्या पर्यावरण-संवेदनशील क्षेत्राबाबत आढावा बैठक संपन्न झाली.
जिल्हाधिकारी, बीड यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी नायगाव मयूर वन्यजीव अभयारण्याच्या पर्यावरण-संवेदनशील (Eco-Sensitive Zone – ESZ) क्षेत्राबाबत सनियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न झाली.
यावेळी अभयारण्य परिसरातील पर्यावरण संवर्धन, वन्यजीव संरक्षण तसेच पर्यावरण-संवेदनशील क्षेत्राच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.
बैठकीस श्री. अमोल गर्कल, विभागीय वन अधिकारी (प्रा.), बीड, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नगर रचना कार्यालय, वन्यजीव विभाग तसेच मानद पक्षी व वन्यजीव रक्षक यांचे अधिकारी उपस्थित होते.
पर्यावरणाचे संवर्धन, वन्यजीवांचे संरक्षण आणि शाश्वत विकास यांचा समतोल साधण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे. असे यावेळी सांगण्यात आले
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis