
छत्रपती संभाजीनगर, 11 ऑगस्ट (हिं.स.)करमाड कुंभेफळ येथील कलाकेंद्र तात्काळ बंद करण्यात यावे या मागणीसाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन घेण्यात आले. या कला केंद्राचा नागरिकांना मोठ्या प्रमाणामध्ये त्रास होत असून हे कला केंद्र तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात कलाकेंद्र मुळे होणारा त्रास नमूद केला आहे.ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन सदरील कलाकेंद्रावर कारवाई करून ते तात्काळ बंद करण्यात यावा अन्यथा शेकडो महिला घेऊन कलाकेंद्राला कुलूप लावण्यात येईल असा इशारा या वेळी देण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis