पुणे विद्यापीठात ‘डॉ. प्रमोद चौधरी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर अॅडव्हान्स्ड बायोइकॉनॉमी’ केंद्र सुरू
पुणे, 11 ऑगस्ट (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (एसपीपीयू) जैव अर्थव्यवस्थेच्या उदयोन्मुख क्षेत्रातील संशोधन, शिक्षण आणि उद्योग सहकार्याला चालना देण्यासाठी ‘डॉ. प्रमोद चौधरी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर अॅडव्हान्स्ड बायोइकॉनॉमी’ केंद्र सुरू करण
University Pune SPUU


पुणे, 11 ऑगस्ट (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (एसपीपीयू) जैव अर्थव्यवस्थेच्या उदयोन्मुख क्षेत्रातील संशोधन, शिक्षण आणि उद्योग सहकार्याला चालना देण्यासाठी ‘डॉ. प्रमोद चौधरी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर अॅडव्हान्स्ड बायोइकॉनॉमी’ केंद्र सुरू करण्यात आले. प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी या केंद्रासाठी ७५ लाख रुपयांची देणगी दिली आहे.

केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, डॉ. प्रमोद चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, तंत्रज्ञान विभागातील डॉ. सोमनाथ नंदी, डॉ. वंदना धिंग्रा, प्राज इंडस्ट्रीजचे घनश्याम देशपांडे, अतुल मुळे, डॉ. प्रमोद कुंभार, दत्तात्रय निंबोळकर आणि आनंद घोसाळकर उपस्थित होते.

केंद्राच्या उपक्रमांची माहिती देताना डॉ. सोमनाथ नंदी यांनी सांगितले की, चालू शैक्षणिक वर्षापासून एमटेकच्या विद्यार्थ्यांसाठी ‘शाश्वत विकासासाठी जैव-अर्थव्यवस्था’ आणि ‘जैवइंधन व जैवऊर्जा’ हे दोन नवीन अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना जैव अर्थव्यवस्थेतील आधुनिक तंत्रज्ञान, शाश्वत विकास आणि जैवऊर्जा क्षेत्रातील संधींचे शैक्षणिक प्रशिक्षण मिळणार आहे.

या केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठातील संशोधनाला उद्योग क्षेत्राशी जोडण्यावरही भर दिला जाणार आहे. जैवइंधन, जैवऊर्जा आणि शाश्वत जैव-अर्थव्यवस्थेशी संबंधित संशोधन व नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

केंद्राच्या संचालकपदासाठी डॉ. अनिरुद्ध देशपांडे यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande