
छत्रपती संभाजीनगर, 11 ऑगस्ट (हिं.स.)।खासदार सुप्रिया सुळे यांच्या कन्येच्या विवाह स्वागत समारंभानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची छत्रपती संभाजी नगर येथील शिवसेनेचे खासदार संदिपान भूमरे यांनी आपुलकीने भेट घेतली. यावेळी पवार आणि भूमरे यांच्यात राजकीय प्रवासातील जुन्या आठवणी, विविध प्रसंग आणि यापूर्वी झालेल्या संवादांना उजाळा देत मनमोकळ्या गप्पा रंगल्या. अनेक वर्षांपूर्वीच्या भेटीतील प्रसंग आणि चर्चेतील किस्से पवार यांनी सहजपणे आठवल्याने भूमरे भावूक झाले. राजकारणात विचारधारा आणि मतभेद असले तरी वैयक्तिक जिव्हाळा, माणुसकी आणि जुन्या नात्यांची जपणूक महत्त्वाची असल्याचे या भेटीतून दिसून आले. या आपुलकीच्या भेटीमुळे भूमरे यांच्यासाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis