सोलापूर : यशोधरा हॉस्पिटलविरोधात आर.बी. दयावान संस्थेचे आंदोलन; चौकशीची मागणी
सोलापूर, 11 ऑगस्ट (हिं.स.)।यशोधरा हॉस्पिटलमधील रुग्णांच्या उपचारांचे बिल, औषधांच्या दरांसह विविध बाबींमध्ये गैरप्रकार होत असल्याचा आरोप करत आर.बी. दयावान संस्थेच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. हॉस्पिटल प्रशासन आणि संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांची
sdfg


सोलापूर, 11 ऑगस्ट (हिं.स.)।यशोधरा हॉस्पिटलमधील रुग्णांच्या उपचारांचे बिल, औषधांच्या दरांसह विविध बाबींमध्ये गैरप्रकार होत असल्याचा आरोप करत आर.बी. दयावान संस्थेच्या वतीने आंदोलन सुरू करण्यात आले आहे. हॉस्पिटल प्रशासन आणि संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी संस्थेने केली आहे.

संस्थेच्या वतीने पूनम गेट येथे अर्धनग्न आंदोलन सुरू असून, मागण्यांवर कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी कार्यकर्ते व पदाधिकारी विविध ठिकाणी आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

संस्थेने केलेल्या आरोपानुसार, यशोधरा हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून उपचाराचे बिल आणि औषधांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात रक्कम आकारली जात आहे. हॉस्पिटलमधीलच मेडिकलमधून औषधे घेण्याची सक्ती केली जात असून, काही औषधांचे दर बाहेरील बाजारभावाच्या तुलनेत अधिक असल्याचा दावा संस्थेने केला आहे.

तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांमध्ये ऑपरेशनच्या नावाखाली अधिक रकमेचे अंदाजपत्रक तयार करून शासनाची आर्थिक फसवणूक होत असल्याचा आरोपही संस्थेने केला आहे. महानगरपालिकेच्या मेडिकेअर कॅशलेस योजनेतही अधिक रकमेचे अंदाजपत्रक तयार करून हॉस्पिटलने मोठ्या प्रमाणात बिले उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातून येणाऱ्या गंभीर व आपत्कालीन रुग्णांना सरकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये न नेता खासगी रुग्णालयात आणले जात असल्याचाही आरोप संस्थेने केला आहे. काही रुग्णवाहिका चालक आणि हॉस्पिटल प्रशासन यांच्यात संगनमत असल्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट होत असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करून सक्तवसुली संचालनालय (ईडी), मुंबई तसेच मंत्रालयाच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी संस्थेने केली आहे.संस्थेच्या म्हणण्यानुसार, या मागण्यांसाठी ४ ऑगस्ट २०२६पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पूनम गेटसमोर धरणे आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे.

दरम्यान, हॉस्पिटल प्रशासनाची या आरोपांवरील अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी केलेल्या आरोपांची स्वतंत्र प्रशासकीय चौकशी झाल्यानंतरच त्यातील तथ्य स्पष्ट होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande