नाशिक - चार महिन्यांपूर्वी काँक्रीट केलेला रस्ता पुन्हा फोडला; राष्ट्रवादीच्या नगरसेविका आक्रमक
स्मार्टसिटीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित नाशिक, 11 ऑगस्ट (हिं.स.)। महापालिका कार्यालय ते कॅनडा कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण होऊन अवघे तीन ते चार महिने उलटत नाही तोच स्मार्टसिटीच्या कामासाठी पुन्हा रस्ता फोडण्याचे काम सुरू असल्याचे
The road that was concreted


स्मार्टसिटीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित

नाशिक, 11 ऑगस्ट (हिं.स.)। महापालिका कार्यालय ते कॅनडा कॉर्नरपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण होऊन अवघे तीन ते चार महिने उलटत नाही तोच स्मार्टसिटीच्या कामासाठी पुन्हा रस्ता फोडण्याचे काम सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी ते बंद पाडले. काँक्रिटीकरणासाठी वर्षभर बंद असलेला हा रस्ता नुकताच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

स्मार्ट सिटी आणि मनपा प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला असून रस्ता फोडण्याचे काम सुरू असताना तेथे स्मार्ट सिटीचा एकही अभियंता उपस्थित नसल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. याहाहत चौकशी केली असता, काम करणारे मजूर धुळ्याचे असून संबंधित ठेकेदार फिरोज यांच्याशी संपर्क साधला असता तो देवळाली येथे असल्याची बाब समोर आल्याचे नगरसेविका पाटील म्हणाल्या.

स्मार्ट सिटीच्या सीसीटीव्ही कॅमेर्यासाठी चेंबर करण्याचे काम सुरू असल्याचे यावेळी कामगारांनी पाटील यांना सांगितले.

नियोजनाच्या अभावावर सवाल

रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यापूर्वी सीसीटीव्हीच्या चेंबरचे नियोजन का करण्यात आले नाही, असा सवाल नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी उपस्थित केला. तसेच चार महिन्यांपूर्वी खूला झालेला हा रस्ता पुन्हा फोडण्याची वेळ का आली. तसेच कामाच्या ठिकाणी महापालिका किंवा स्मार्ट सिटीचा अभियंता उपस्थित नसल्याने प्रशासनाच्या कारभारावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

रस्ता त्वरित दुरुस्त करावा

वाहतुकीसाठी सुरु झालेला रस्ता काही महिन्यांत फोडून दुरुस्तीसाठी पुन्हा खर्च करणे हा नागरिकांच्या पैशांचा अपव्यय आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून लेखी परवानगीशिवाय ते सुरू करू नये, तसेच फोडलेला रस्ता योग्य तांत्रिक निकषांनुसार तातडीने दुरुस्त करावा, अशी मागणी नगरसेविका डॉ. पाटील यांनी मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे केली.

नियोजनशुन्य कारभाराला विरोध

आपला विकासकामांना विरोध नसून, विकासाच्या नावाखाली नियोजनशून्य कामे आणि नागरिकांच्या पैशांचा अपव्यय याला विरोध आहे.

- डॉ. हेमलता पाटील, नगसेविका, राष्ट्रवादी काँग्रेस

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande