
नाशिक. , 11 ऑगस्ट (हिं.स.) : नाशिक मध्ये आत्तापर्यंत तीन जणांचा स्वाइन फ्लू ने मृत्यू झाला असून आत्तापर्यंत 68 हजार नागरिकांची स्क्रीनिंग करण्यात आलेली आहे
शहरातील जीवघेण्या खड्यांमुळे आधीच त्रस्त असलेल्या नाशिककरांसमोर आता स्वाइन फ्लूचे नवे संकट उभे ठाकले आहे. जानेवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यात ४३ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, तिघांचा मृत्यू झाला आहे. पावसाळा सुरू होताच संसगनि वेग घेतल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जानेवारी ते जून या सहा महिन्यांत स्वाइन फ्लूचे केवळ सात रुग्ण आढळले होते. मात्र जुलैपासून परिस्थिती झपाट्याने बदलली. जुलैमध्ये तब्बल २१ रुग्ण, तर ऑगस्टच्या पहिल्या दहा दिवसांतच १५ नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे अवघ्या दीड महिन्यात रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. एकूण ४३ पैकी ३० रुग्ण नाशिक शहरातील, तर १३ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात स्वाइन फ्लूमुळेतिघांचा मृत्यू झाला. यात दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथील ६९ वर्षीय महिला, पिंपळणारे येथील ५५ वर्षीय पुरुष आणि नाशिक शहरातील आडगाव परिसरातील ६६ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. आरोग्य विभागाने जानेवारीपासून आतापर्यंत ६८ हजार १२२ नागरिकांचे स्क्रीनिंग केले. त्यापैकी २२९ जणांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्याने त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले. यातील ४३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. सध्या १२ रुग्ण रुग्णालयात उपचार घेत असून, २८ जण उपचारानंतर बरे झाले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI