पश्चिम बंगाल : मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग
खराब हवामानामुळे कोलघाट येथे उतरवले हेलिकॉप्टर कोलकाता, 11 ऑगस्ट (हिं.स.) : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांच्या हेलिकॉप्टरचे आज, मंगळवारी खराब हवामानामुळे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील कोलाघाट येथे हेलिक
कोलघाट येथे आपातकालिन उतरवण्यात आलेले हेलिकॉप्टर


खराब हवामानामुळे कोलघाट येथे उतरवले हेलिकॉप्टर

कोलकाता, 11 ऑगस्ट (हिं.स.) : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांच्या हेलिकॉप्टरचे आज, मंगळवारी खराब हवामानामुळे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील कोलाघाट येथे हेलिकॉप्टर उतरवण्यात आले.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी दमदम येथून हेलिकॉप्टरने केशपूरकडे रवाना झाले होते. मात्र, मार्गातील खराब हवामानाची परिस्थिती लक्षात घेऊन पायलटने खबरदारीचा उपाय म्हणून कोलाघाट येथील एका मोकळ्या मैदानात हेलिकॉप्टर उतरवले. मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी हे स्वातंत्र्यसैनिक खुदीराम बोस यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी केशपूरकडे जात होते. हेलिकॉप्टरचे लँडिंग झाल्यानंतर मुख्यमंत्री रस्तेमार्गे पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील केशपूर येथील नियोजित कार्यक्रमस्थळी रवाना झाले. पश्चिम बंगालमधील हवामानाबाबत भारतीय हवामान विभागाने यापूर्वीच इशारा जारी केला होता. मंगळवारी बंगालच्या अनेक भागांमध्ये हवामान अचानक बिघडले.हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. काही भागांत मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी उकाडा आणि दमट हवामानामुळे नागरिकांच्या अडचणी वाढू शकतात.हवामान विभागाने 6 ते 19 ऑगस्ट या कालावधीसाठी विस्तारित हवामान अंदाज जारी केला आहे. या अंदाजानुसार, आगामी दोन आठवड्यांत देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande