रत्नागिरी : चिपळूणला गुरुवारी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन
रत्नागिरी, 11 ऑगस्ट, (हिं.स.) । चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयात राज्य शासनाचा कृषि विभाग आणि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑगस्ट रोजी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रानभाज्यांचे महत्त्व, पोषणमूल्य तसेच जैववि
रत्नागिरी : चिपळूणला गुरुवारी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन


रत्नागिरी, 11 ऑगस्ट, (हिं.स.) । चिपळूण येथील डीबीजे महाविद्यालयात राज्य शासनाचा कृषि विभाग आणि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने १३ ऑगस्ट रोजी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

रानभाज्यांचे महत्त्व, पोषणमूल्य तसेच जैवविविधतेचे संवर्धन याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवात रानभाज्यांचे प्रदर्शन व विक्री, रानभाजी पाककृती स्पर्धा, भित्तिपत्रक स्पर्धा तसेच ‘रील’ स्पर्धा घेण्यात येणार आहेत. विविध स्पर्धांमध्ये प्रथम तीन क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

पाककृती स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी रानभाजीपासून तयार केलेला पदार्थ घरून तयार करून आणणे आवश्यक आहे. तसेच त्या पदार्थाची पाककृती आणि त्यातील पौष्टिक गुणधर्माची माहिती कागदावर लिहून आणावी, असे आयोजकांनी कळविले आहे.

विद्यार्थ्यांना आपल्या नैसर्गिक अधिवासाची तसेच रानभाज्यांची अधिक माहिती मिळावी आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जागृती निर्माण व्हावी, यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चिपळूण तालुक्यातील सर्व महाविद्यालये, शाळा तसेच नागरिकांनी महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या महोत्सवाचे आयोजन डीबीजे कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचा एनएसएस विभाग, महिला विकास कक्ष, स्वयंसिद्धा समिती आणि अॅग्रिकल्चर विभाग यांच्या वतीने करण्यात येत आहे. चेअरमन मंगेश तांबे आणि प्राचार्य डॉ. माधव बापट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. योगेश आगवेकर, प्रा. सौ. स्वरदा कुलकर्णी, रजिस्ट्रार विजयेंद्र जाधव यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रयत्न करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande