नांदेड - प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत १३ ऑगस्टपर्यंत वाढवली
नांदेड, 11 ऑगस्ट (हिं.स.)। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी)-२०२५ अंतर्गत पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकपदभरती साठी प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत ११ ऑगस्टऐवजी १३ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती सा
नांदेड - प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत १३ ऑगस्टपर्यंत वाढवली


नांदेड, 11 ऑगस्ट (हिं.स.)। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी)-२०२५ अंतर्गत पवित्र पोर्टलमार्फत शिक्षकपदभरती साठी प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत ११ ऑगस्टऐवजी १३ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती साठी मुदत वाढवण्याची मागणी करण्यात आली होती पवित्र पोर्टल मध्ये अर्ज सादर करताना येत असलेल्या तांत्रिक अडचणी आणि समस्या या संदर्भात विचार करण्यात आला.

https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/.../Home.aspx संकेतस्थळावरील भार लक्षात घेऊन उमेदवारांना अडचणी येऊ नयेत, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असून, उमेदवारांनी वाढीव मुदतीत प्राधान्यक्रम लॉक करावेत, असे आवाहन शालेय शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande