
छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट (हिं.स.)। येथीटल वैजापूर शहरातील मिल्लत नगर परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये डांबून ठेवलेल्या १६ गोवंश जनावरांची पोलिसांनी सुटका केली. या कारवाईत ४ लाख ९१ हजार रुपये किमतीची जनावरे असा एकूण ४ लाख ९१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
गोपनीय माहितीच्या आधारे वैजापूर पोलिसांनी शेडवर छापा टाकला. यावेळी जनावरांना अत्यंत कमी जागेत आखूड दोऱ्यांनी बांधून ठेवण्यात आले होते. तसेच चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. पोलिसांनी सर्व जनावरांची सुटका करून त्यांना हडसपिंपळगाव येथील श्री रेणुका गोशाळेत हलविले. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या मागील संपूर्ण साखळीचा तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis