एएमएनएसकडून खालापूरमधील ८० क्षयरुग्णांना पोषण आहाराचे वाटप
निक्षय मित्र’ म्हणून सीएसआर उपक्रम; टीबीमुक्त भारत अभियानाला हातभार खालापूर, १२ ऑगस्ट (हिं.स.)। पंतप्रधानांच्या ‘टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत क्षयरोगमुक्त जिल्हा आणि क्षयरोगमुक्त गावांची संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाला हात
# आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया ‘निक्षय मित्र’; खालापूरमधील ८० टीबी रुग्णांना फूड बास्केट  **खालापूर :** पंतप्रधानांच्या ‘टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत क्षयरोगमुक्त जिल्हा आणि क्षयरोगमुक्त गावांची संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाला हातभार लावत आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लिमिटेड (AMNS), खालापूर यांनी कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) अंतर्गत ‘निक्षय मित्र’ म्हणून सहभाग नोंदविला. कंपनीच्या वतीने खालापूर तालुक्यातील ८० क्षयरुग्णांना फूड बास्केटचे वाटप करण्यात आले.  क्षयरोगाच्या उपचारादरम्यान रुग्णांना दीर्घकाळ नियमित औषधोपचारांसोबत सकस आणि पौष्टिक आहाराची आवश्यकता असते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना पोषणयुक्त आहार घेणे अनेकदा शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा क्षयरोग कार्यालयामार्फत विविध उद्योग, संस्था आणि सामाजिक संघटनांनी ‘निक्षय मित्र’ म्हणून पुढे येऊन क्षयरुग्णांना पोषण सहाय्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्याला प्रतिसाद देत AMNS कंपनीने हा उपक्रम राबविला.  वावोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात फूड बास्केट वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमासाठी तत्कालीन जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक समन्वय साधला. त्यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांना उपक्रमाची माहिती देत सहकार्य मिळविले. तसेच जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनीषा चव्हाण यांनी क्षयरुग्णांसाठी फूड बास्केटची गरज अधोरेखित करून संबंधित कंपनीला सहकार्याचे आवाहन केले.  कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या प्रमिला पाटील, शिरवलीचे सरपंच महेश पाटील, AMNSचे प्रशासकीय अधिकारी किरण वायदे, प्रशासन विभाग प्रमुख किरण वैद्य, CSR व्यवस्थापक सतीश भुसाले, अमोल पारंगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कल्याणी इंगोले, डॉ. मानसी कस्तुरे, डॉ. सीमा पाईकराव, जिल्हा पीपीएम समन्वयक सतीश दंतराव, महेंद्र पिंगळे, समाधान धनवे, आरोग्य सहाय्यक लता अडसूळ यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


निक्षय मित्र’ म्हणून सीएसआर उपक्रम; टीबीमुक्त भारत अभियानाला हातभार

खालापूर, १२ ऑगस्ट (हिं.स.)। पंतप्रधानांच्या ‘टीबी मुक्त भारत अभियान’ अंतर्गत क्षयरोगमुक्त जिल्हा आणि क्षयरोगमुक्त गावांची संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या अभियानाला हातभार लावत आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लिमिटेड (AMNS), खालापूर यांनी कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) अंतर्गत ‘निक्षय मित्र’ म्हणून सहभाग नोंदविला. कंपनीच्या वतीने खालापूर तालुक्यातील ८० क्षयरुग्णांना फूड बास्केटचे वाटप करण्यात आले.

क्षयरोगाच्या उपचारादरम्यान रुग्णांना दीर्घकाळ नियमित औषधोपचारांसोबत सकस आणि पौष्टिक आहाराची आवश्यकता असते. मात्र, आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना पोषणयुक्त आहार घेणे अनेकदा शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा क्षयरोग कार्यालयामार्फत विविध उद्योग, संस्था आणि सामाजिक संघटनांनी ‘निक्षय मित्र’ म्हणून पुढे येऊन क्षयरुग्णांना पोषण सहाय्य करावे, असे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत एएमएनेस ने हा उपक्रम राबविला.

वावोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात वितरण

वावोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात फूड बास्केट वितरणाचा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमासाठी तत्कालीन जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून आवश्यक समन्वय साधला. त्यांनी जिल्हाधिकारी किशन जावळे यांना उपक्रमाची माहिती देऊन सहकार्य मिळविले. तसेच जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. मनीषा चव्हाण यांनी क्षयरुग्णांसाठी फूड बास्केटची गरज अधोरेखित करून संबंधित कंपनीला सहकार्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या प्रमिला पाटील, शिरवलीचे सरपंच महेश पाटील, एएमएनएसचे प्रशासकीय अधिकारी किरण वायदे, प्रशासन विभाग प्रमुख किरण वैद्य, CSR व्यवस्थापक सतीश भुसाले, अमोल पारंगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कल्याणी इंगोले, डॉ. मानसी कस्तुरे, डॉ. सीमा पाईकराव, जिल्हा पीपीएम समन्वयक सतीश दंतराव, महेंद्र पिंगळे, समाधान धनवे, आरोग्य सहाय्यक लता अडसूळ यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

क्षयरुग्णांना उपचारासोबत आवश्यक पोषण मिळावे आणि त्यांना आजारावर मात करण्यासाठी आधार मिळावा, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून स्वागत करण्यात आले.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande