छ. संभाजीनगर - अंबड तालुका युवासेनेच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा
छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट (हिं.स.)। दर्शना बंगला येथे शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वाखाली अंबड तालुका युवासेनेच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येन
अ


छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट (हिं.स.)। दर्शना बंगला येथे शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या नेतृत्वाखाली अंबड तालुका युवासेनेच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते.

कार्यकारिणी जाहीर करताना आमदार अर्जुनराव खोतकर यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. “शिवसैनिक या नात्याने जनसामान्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हा. प्रत्येक नागरिकाला शक्य ती मदत करा आणि सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सदैव पुढाकार घ्या,” असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी युवासेना सचिव अभिमन्यू खोतकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, उपजिल्हाप्रमुख रावसाहेब पवार, जिल्हाकार्याध्यक्ष संतोष जेधे, युवासेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब इंगळे, युवासेना जिल्हाध्यक्ष अमोल ठाकूर, लोकसभा प्रमुख गणेश मोहिते, शिवउद्योग सहकार सेना जिल्हाप्रमुख दत्ता शिराळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख दिलीप वाढेकर, तालुका प्रमुख महेश रायकर, युवासेना शहरप्रमुख रुद्र घुगेआदी पदाधिकारी उपस्थित होते.

नवनियुक्त पदाधिकारी अंबड तालुका युवासेना व शिवसेनेच्या विविध पदांवर पुढील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली—

अविनाश शिंदे — युवासेना जिल्हाकार्याध्यक्ष

विनोद जाधव — युवासेना उपजिल्हाप्रमुख

शोभाताई वाघराळ— महिला आघाडी तालुकाप्रमुख, अंबड

अय्युब बागवान— अल्पसंख्याक तालुकाप्रमुख, अंबड

लक्ष्मण गोडसे — विधानसभा प्रमुख, अंबड

संजय पडुळ — तालुका संपर्कप्रमुख, अंबड

बाळासाहेब काळवने - तालुका कार्याध्यक्ष

गणेश समिंदर — तालुका संघटक, अंबड

हरिओम इंगळे — तालुका सरचिटणीस, अंबड

प्रशांत पैठणे — तालुका समन्वयक, अंबड

शरद पावसे — उपतालुकाप्रमुख, अंबड

नाशेर शेख — अल्पसंख्याक उपतालुकाप्रमुख, अंबड

राम देठे — सर्कल प्रमुख, रोहिलागड

वैभव कामटे — उपशहरप्रमुख

सागर इंगळे — उपशहरप्रमुख

श्रीराम पोखरकर — सर्कल प्रमुख, जामखेड

अथर्व बोचरे — सर्कल प्रमुख, साष्टपिंपळगाव

जयराज उबाळे - युवासेना शहर संघटक

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षाची ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासह नागरिकांच्या प्रश्नांसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यकारिणी जाहीर झाल्याने अंबड तालुक्यात युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळणार असल्याचे यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने तरुण कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते. आगामी काळात अंबड तालुक्यात युवासेनेची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी सक्रियपणे काम करणार आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande