प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती; इच्छुकांकडून अर्ज मागविले
छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट (हिं.स.)। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीची स्थापना करावयाची आहे. त्यात अशासकीय सदस्यांची नियुक्ती करावयाची आहे. त्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,असे जिल्हा उपायुक्त पशुस
प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीच्या अशासकीय सदस्यांची नियुक्ती; इच्छुकांकडून अर्ज मागविले


छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट (हिं.स.)।

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा प्राणी क्लेष प्रतिबंधक सोसायटीची स्थापना करावयाची आहे. त्यात अशासकीय सदस्यांची नियुक्ती करावयाची आहे. त्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत,असे जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय जिल्हा परिषद डॉ. एन.एस. कदम यांनी कळविले आहे.

या समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी असतात. या समितीत अशासकीय सदस्य नियुक्त करावयाचे आहेत. त्यात जिल्ह्यातील गोशाळा/पांजरपोळ संस्थेचा अध्यक्ष, प्राणी कल्याण विषयक कार्य करणाऱ्या संस्थेचे दोन सदस्य, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशीत केलेल्या दोन व्यक्ती, मानवहितकारक तसेच प्राणी कल्याण क्षेत्रात कार्य करणारे व्यक्ती असे सदस्य नेमण्यात येणार आहेत. या सदस्यांना कार्यकाळ तीन वर्षांचा राहील. इच्छुक व्यक्तींनी आपले अर्ज जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयात सादर करावे. अर्जाचा नमुना त्याच कार्यालयात उपलब्ध आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande