छ. संभाजीनगर - ‘रेड रन’ स्पर्धा उत्साहात संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवकांमध्ये एचआयव्ही/एड्सविषयीजनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक आणि क्रीडा विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमा
अ


छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवकांमध्ये एचआयव्ही/एड्सविषयीजनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक आणि क्रीडा विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रेड रन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत युवक व युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

विद्यापीठाच्या क्रीडा विभागापासून स्पर्धेला सुरुवात झाली. ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव डॉ. सलामपुरे यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचा शुभारंभ केला. क्रीडा विभागापासून विद्यापीठ प्रवेशद्वार, लिटल फ्लॉवर स्कूल चौक आणि तेथून पुन्हा क्रीडा विभाग असा स्पर्धेचा मार्ग होता.

रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रकाश महाजन, डॉ. शिल्पा जिवरग, सतीश पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी साधना गंगावणे, जिल्हा पर्यवेक्षक संजय पवार तसेच सीपीओ सरिता विधाते यांची प्रमुख उपस्थिती होती.

युवक गटातील विजेते

रेड रन स्पर्धेच्या युवक गटात संत तुकाराम महाविद्यालय, कन्नड येथील अतुल गोकूळ जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शेख खाकान अहमद यांनी द्वितीय, तर नाईक महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील आकाश चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.

युवती गटातील विजेत्या

युवती गटात पंडित नेहरू मभहाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील मनीषा पाडवी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. बाभूळगाव येथील जयश्री बाळू नरोडे यांनी द्वितीय, तर दिपाली गणेश आगवणे यांनी तृतीय क्रमांक पटकाविला.

स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांनाही सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांना एचआयव्ही/एड्स प्रतिबंध व जनजागृतीच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याची शपथ देण्यात आली. तसेच एचआयव्ही/एड्स जनजागृतीविषयक पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले व माहिती, शिक्षण व संवाद (IEC) साहित्याचे वाटप करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande