भोरमध्ये सर्वरोगनिदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १,३२३ रुग्णांची तपासणी
पुणे, 12 ऑगस्ट (हिं.स.)। स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त भोर उपजिल्हा रुग्णालयात आयोजित सर्वरोगनिदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात विविध आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी १ हजार ३२३ रुग्णांची तपासणी केली. त्यापैकी आवश्यक
भोरमध्ये सर्वरोगनिदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; १,३२३ रुग्णांची तपासणी


पुणे, 12 ऑगस्ट (हिं.स.)। स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त भोर उपजिल्हा रुग्णालयात आयोजित सर्वरोगनिदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात विविध आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी १ हजार ३२३ रुग्णांची तपासणी केली. त्यापैकी आवश्यकतेनुसार २०१ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भीय सेवा देण्यात आली.

शिबिरामध्ये विविध आजारांचे निदान, तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, उपचार तसेच पुढील उपचाराबाबत मार्गदर्शनाची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

या वेळी जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अमोल नलावडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत शिवतरे, सदस्य विक्रम खुटवड व प्रवीण जगदाळे, पंचायत समिती सभापती मनीषा कंक, नगराध्यक्ष रामचंद्र नाना आवारे, पंचायत समिती उपसभापती विशाल कोंडे, तृप्ती खुटवड, राजेश बोडके, प्रांत अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार राजेंद्र नजन, गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट, तालुका आरोग्य अधिकारी मिलिंद अहिरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande