
छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। जालना येथे भाजपा जिल्हा कार्यालयाच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, दि. १४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते हा भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने कार्यक्रमस्थळाची पाहणी करून मंच व्यवस्था, बैठक व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था तसेच इतर आवश्यक नियोजनाचा सविस्तर आढावा घेतला.
यावेळी माजी. केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, आमदार कैलास गोरंट्याल, महानगराध्यक्ष भास्कर आबा दानवे बद्रीभाऊ पठाडे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी हितासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्री महोदयांचा होणारा सत्कार हा शेतकरी बांधवांच्या कृतज्ञतेची, विश्वासाची आणि आपुलकीची भावना व्यक्त करणारा गौरवसोहळा ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis