नेरळ येथे २३ ऑगस्टला रक्तदान शिबिर; ‘चला, शिवकार्य करूया’चे आवाहन
रायगड, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। : रायगड परिवार व कर्तव्य प्रेस असोसिएशन, नेरळ फोटोग्राफर असोसिएशन आणि मातोश्री सुमती चिंतामणी डीपीएस कला व वाणिज्य महाविद्यालय, ममदापूर-नेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २३ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आ
Blood donation camp in Neral on August 23; call to ‘Come, let us undertake the work of Shivaji Maharaj’


रायगड, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। : रायगड परिवार व कर्तव्य प्रेस असोसिएशन, नेरळ फोटोग्राफर असोसिएशन आणि मातोश्री सुमती चिंतामणी डीपीएस कला व वाणिज्य महाविद्यालय, ममदापूर-नेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २३ ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ‘राजा शिवछत्रपती परिवार’च्या संयुक्त मोहीम क्रमांक १४ अंतर्गत हे शिबिर घेण्यात येणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

हे रक्तदान शिबिर सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत हुतात्मा हिरोजी पाटील सामाजिक सभागृह, नेरळ (आगरी समाज हॉल) येथे होणार आहे. रक्तदान हे गरजू रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे तसेच विविध आजारांमुळे रक्ताची आवश्यकता असलेल्या रुग्णांना त्याचा मोठा फायदा होतो.

रक्तदानामुळे जीवन वाचविण्याच्या सामाजिक कार्यात योगदान देता येते. रक्तदान केल्यानंतर शरीरात नवीन रक्तनिर्मितीची प्रक्रिया सुरू होते, तसेच समाजोपयोगी कार्य केल्याचे समाधानही मिळते. त्यामुळे पात्र आणि इच्छुक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘चला, शिवकार्य करूया...!’ या संदेशातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न या उपक्रमाच्या माध्यमातून केला जात आहे. रक्तदानासाठी इच्छुक नागरिकांनी आयोजकांशी संपर्क साधून शिबिरात सहभागी व्हावे, संपर्क सचिन ७७७४८३३३८७, राजेश ८१४९६२०९६६, सागर ९६७३०५३१८, गिरीश ९७८४१३७०७ असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande