
छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। भारतीय जनता पार्टी, जालना जिल्हा कार्यालयाच्या नवीन वास्तूच्या भूमिपूजन सोहळ्यानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस दि. १४ ऑगस्ट रोजी जालना शहरात येत आहेत. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या उपस्थितीत जालना येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री महोदयांच्या जालना दौऱ्याच्या अनुषंगाने होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा, नियोजन आणि विविध व्यवस्थांबाबत माध्यम प्रतिनिधींशी सविस्तर संवाद साधण्यात आला. तसेच, या ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis