
छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट (हिं.स.)। विकसीत भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियान(ग्रामिण) कायदा २०२५ बाबत त्रिस्तरीय पंचायत राज संस्थांचे लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी यांचे जिल्हास्तरीय पंच संमेलन गुरुवार दि.१३ रोजी होणार आहे. एमआयटी कॉलेज बीड बायपास येथे सकाळी ९ वा. हे संमेलन होणार आहे, असे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी (ग्रामिण) रुपेश सिंगारे यांनी कळविले आहे.
या संमेलनास रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले हे अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत. तर इमाव कल्याण, दुग्ध विकास, अपारंपारिक उर्जा व दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे, सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या संमेलनास रोहयो विभागाचे सचिव अप्पासाहेब धुळाज हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis