अ. भा. स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र संघटनेच्या उपाध्यक्षपदी लातूरच्या डॉ. कल्याण बरमदे बिनविरोध
लातूर, 12 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर येथील ख्यातनाम वंध्यत्व निवारण व प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ डॉ. कल्याण बलभीमराव बरमदे यांची अखिल भारतीय स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय स्त्री रोग व प्रसूतिश
डॉ कल्याण बरमदे


लातूर, 12 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर येथील ख्यातनाम वंध्यत्व निवारण व प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ डॉ. कल्याण बलभीमराव बरमदे यांची अखिल भारतीय स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र संघटनेच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय स्त्री रोग व प्रसूतिशास्त्र संघटना ( Federation of Obstetric and Gynaecological Societies of India -FOGSI) ही भारतातील स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र क्षेत्रातील डॉक्टरांची एक अग्रगण्य राष्ट्रीय संघटना आहे. देशभरातील २९५ सदस्य संघटनांच्या माध्यमातून ४७ हजारांहून अधिक स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ डॉक्टरांना एकत्र आणण्याचे काम या संघटनेच्या माध्यमातून सातत्याने केले जाते.

या संघटनेच्या उपाध्यक्षपदी लातूरच्या बरमदे हॉस्पिटलचे संचालक डॉ. कल्याण बरमदे यांची बिनविरोध निवड होणे ही केवळ लातूर - मराठवाडाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. डॉ. कल्याण बरमदे यांनी आतापर्यंत हजारो अपत्यहिन दांपत्यांच्या जीवनात अपत्यप्राप्तीचा आनंद प्रदान करण्याचे काम केले आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्रातीलच नव्हे तर शेजारच्या अंधार प्रदेश, तेलंगाणा , कर्नाटकातील रुग्णही मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात.

या निवडीबद्दल बोलताना डॉ. बरमदे यांनी ' देशव्यापी आणि जागतिक स्तरावर सर्वात मोठ्या व्यावसायिक संघटनांपैकी एक असलेल्या FOGSI च्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड होणे हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि सन्मानाचा क्षण आहे.ही निवड माझ्यावर दाखवलेला विश्वास, प्रेम आणि सहकाऱ्यांच्या पाठिंब्याचे प्रतीक आहे.ही केवळ माझी निवड नसून, आपल्या संपूर्ण लातूर आणि मराठवाड्याचा सन्मान आहे,अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. डॉ. कल्याण बरमदे यांच्या या निवडीबद्दल वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande