
छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
भारतीय जनता पार्टी, छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालय येथे माजी खासदार तथा भाजप नेते श्री.किरीट सोमय्या यांच्या उपस्थितीत SIR संदर्भातील बैठक संपन्न झाली..
SIR प्रक्रियेबाबत सविस्तर चर्चा करून पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवश्यक मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या. अशी माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. प्रत्येक पात्र मतदाराची नोंद व्यवस्थित राहावी आणि या प्रक्रियेबाबत जनजागृती व्हावी, यासाठी सर्वांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन केले.. असे त्यांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis