लातूर जिल्ह्यातील जळकोट डोंगरगाव तलावात विनापरवाना मासेमारीला बंदी
लातूर, 12 ऑगस्ट (हिं.स.)। मत्स्यव्यवसाय विभागाच्या ३ जुलै २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार जळकोट तालुक्यातील डोंगरगाव तलावात विनापरवाना मासेमारी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तलावात मासेमारी करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी मत्स्यव्यवसाय विभागाकडून र
डोंगरगाव तलाव


लातूर, 12 ऑगस्ट (हिं.स.)। मत्स्यव्यवसाय विभागाच्या ३ जुलै २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार जळकोट तालुक्यातील डोंगरगाव तलावात विनापरवाना मासेमारी करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तलावात मासेमारी करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी मत्स्यव्यवसाय विभागाकडून रितसर सशुल्क मासेमारी परवाना घेणे अनिवार्य आहे.

डोंगरगाव तलावातील मासेमारीसाठी परवाना वाटपाची कार्यवाही १० ते २६ ऑगस्ट या कालावधीत करण्यात येणार आहे. त्यामुळे मासेमारी करणाऱ्या नागरिकांनी निर्धारित कालावधीत मत्स्यव्यवसाय विभागाकडून आवश्यक परवाना घेऊनच मासेमारी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, तलावात कोणतीही व्यक्ती विनापरवाना मासेमारी करताना आढळून आल्यास संबंधित मासेमारी अवैध घोषित करण्यात येईल. तसेच संबंधित व्यक्तीविरुद्ध नियमानुसार शासकीय कार्यवाही करण्यात येणार असल्याचे लातूर येथील मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त तेजस्विनी करळे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे डोंगरगाव तलावात मासेमारी करणाऱ्या सर्व संबंधितांनी नियमांचे पालन करून आवश्यक सशुल्क परवाना घेऊनच मासेमारी करावी, असे मत्स्यव्यवसाय विभागाने आवाहन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande