स्वातंत्र्य दिनानिमित्त अमरावतीत भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन
अमरावती, 12 ऑगस्ट, (हिं.स.) १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तसेच अमरावती महानगरपालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अमरावती महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य तप
स्वातंत्र्य दिनानिमित्त अमरावतीत भव्य रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन


अमरावती, 12 ऑगस्ट, (हिं.स.) १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तसेच अमरावती महानगरपालिकेच्या ४३ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून अमरावती महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या रक्तदान शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. ‘रक्तदान हे जीवनदान’ असून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी यांच्यासाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. राजेंद्र गोडे वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात येणार आहे.

शिबिरात रक्त व लघवीच्या विविध तपासण्या, हृदयरोग तपासणी, ईसीजी, अस्थिरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग आणि त्वचारोग तपासणी करण्यात येणार आहे. महिलांसाठी विशेष सुविधा म्हणून गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी पेपस्मिअर टेस्ट तसेच स्तन कर्करोगासाठी मॅमोग्राफी करण्यात येणार आहे. या सर्व तपासण्या निःशुल्क करण्यात येणार आहेत.

महानगरपालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी तसेच नागरिकांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा आणि रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन अमरावती महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

स्वातंत्र्य दिन आणि महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन रक्तदानासह मोफत आरोग्य तपासणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande