‘हर घर तिरंगा’ अभियान : धाराशिव येथे १३ ऑगस्टला सायकल व ई-बाईक रॅली
छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासह नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाविषयी अभिमान व जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यात १ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत धाराशिव येथे जिल्
‘हर घर तिरंगा’ अभियान : धाराशिव येथे १३ ऑगस्टला सायकल व ई-बाईक रॅली


छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासह नागरिकांमध्ये राष्ट्रध्वजाविषयी अभिमान व जनजागृती निर्माण करण्यासाठी राज्यात १ ते १७ ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानांतर्गत धाराशिव येथे जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सायकल व ई-बाईक रॅली १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता धाराशिव शहरात काढण्यात येणार आहे.

या रॅलीचा प्रारंभ जिल्हाधिकारी कार्यालयापासून होणार असून,पुढे पोलीस अधीक्षक कार्यालय,महात्मा बसवेश्वर चौक,माणिक चौक मार्गे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट कॉलेज) येथे रॅलीचा समारोप होणार आहे.

या सायकल रॅलीमध्ये सर्व कार्यालय प्रमुख व कर्मचारी यांनी सहभागी होणे अनिवार्य असल्याचे जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले आहेत.त्यानुसार सायकल रॅलीत सहभागी होणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७.१५ वाजता उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले आहे.

‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकावून राष्ट्रध्वजाप्रती सन्मान व देशभक्तीची भावना व्यक्त करावी,तसेच अभियानातील विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा,असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande