जालना शहरात ‘हर घर तिरंगा’ रॅली उत्साहात संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट (हिं.स.)।देशभक्तीची भावना जागृत करत जालना शहरात आज ‘हर घर तिरंगा’ रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये नागरिक, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात तिरं
अ


छत्रपती संभाजीनगर, 12 ऑगस्ट (हिं.स.)।देशभक्तीची भावना जागृत करत जालना शहरात आज ‘हर घर तिरंगा’ रॅलीचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये नागरिक, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी तसेच प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

या तिरंगा रॅलीमध्ये शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी उपस्थित राहून रॅलीचे कौतुक केले. देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान आणि राष्ट्रध्वजाबद्दलचा सन्मान प्रत्येक नागरिकाच्या मनात कायम राहावा, तसेच देशभक्तीची भावना नव्या पिढीमध्ये रुजावी, यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

रॅलीमध्ये जालना जिल्हाधिकारी असिमा मित्तल, SDM रामदास दौंड, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, मनपा आयुक्त अंजली शर्मा, मनपा महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, भाजप महानगर प्रमुख भास्कर दानवे, यांच्यासह विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी, सर्व नगरसेवक उपस्थित होते.

विशेष म्हणजे या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालकवर्ग सहभागी झाला होता. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशभक्तीचा संदेश दिला. रॅलीच्या माध्यमातून नागरिकांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि देशाप्रती असलेली निष्ठा व्यक्त केली.

शहरातील विविध भागातून मार्गक्रमण करणाऱ्या या रॅलीमुळे जालना शहरात देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या एकत्रित सहभागामुळे ‘हर घर तिरंगा’ रॅलीला विशेष उत्साह प्राप्त झाला.

राष्ट्रध्वज हा देशाच्या एकता, अखंडता आणि स्वाभिमानाचे प्रतीक असून प्रत्येक नागरिकाने तिरंग्याचा सन्मान राखत देशभक्तीची भावना आपल्या दैनंदिन जीवनात जपावी, असा संदेश या रॅलीतून देण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande